Thursday, 20 November 2025

मुंबईतील स्वच्छता विषयक ‘सुविधा केंद्र’ उपक्रम पथदर्शी

 मुंबईतील स्वच्छता विषयक ‘सुविधा केंद्र’ उपक्रम पथदर्शी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         मुंबई महानगर प्रदेशात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला गती

·         मुंबईत २४ केंद्रे, ९ प्रगतीपथावर

·         ७.५ लाख नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण ५.५ लाख नागरिकांनी घेतला सुविधा केंद्राचा लाभ

मुंबईदि. १९ : शहरी क्षेत्रातील स्वच्छतापाणी-बचत आणि आरोग्य सुधारणा यासाठी सामाजिक उत्तरदायित्व मधून मुंबईत राबवण्यात आलेला सुविधा केंद्र’ उपक्रम आदर्श मॉडेल ठरत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान गती घेत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या अभियानात विविध संस्था जोडल्या जात आहेत.

हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त भागीदारीत सुरू झालेल्या या उपक्रमाने अल्पावधीत मोठे परिणाम साधले आहेत. सध्या मुंबईत २३ केंद्रे कार्यरत असूनलवकरच २४ वे केंद्र सुरू होणार आहे. मुंबईत आणखी २ केंद्रे बांधकामाधीन असून ७ केंद्रांचे प्रस्ताव प्रगतीपथावर आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकाहिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडएचएसबीसी आणि जेएसडब्ल्यू फाउंडेशन यांच्या सहकार्याने ही योजना पुढील काही वर्षांत अधिक विस्तारणार आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi