Monday, 10 November 2025

शिक्षक पात्रता परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

 शिक्षक पात्रता परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

 

मुंबईदि. 9 – महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025 चे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर 10 नोव्हेंबर 2025 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व परीक्षार्थ्यांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून घ्यावीअसे आवाहन परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

            महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेच्या आयोजनाची कार्यवाही सुरू असून, परीक्षेस प्रविष्ट परीक्षार्थ्यांचे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर 10 नोव्हेंबर 2025 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व परीक्षार्थ्यांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून घ्यावी. प्रवेशपत्र विहीत मुदतीत प्राप्त करून न घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित परीक्षार्थ्यांची राहीलअसे स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi