विकासकुंभाची अशी होणार सुरूवात
नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नियोजित विकासकामांचे भूमीपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कामांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे २ हजार २७० कोटी रुपये, तर नाशिक महानगरपालिकेतर्फे ३ हजार ३३८ कोटी रुपयांची विकास कामे प्रस्तावित आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे व्यापक पायाभूत सोयीसुविधा उभारणी, सुरक्षा व्यवस्थेचे बळकटीकरण, स्वच्छता, व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थेचे सुलभीकरण, धार्मिक पर्यटनाच्या सोयीसुविधांचे अद्ययावतीकरणासाठी महत्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या कामांसाठी एकूण ५ हजार ६५७ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे.
मुख्य कामांमध्ये नवीन पूल बांधण्यासाठी ९४ कोटी ८७ लाख रुपये, नाशिक शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वयानासाठी ४३६ कोटी ५६ लाख रुपये, नाशिक शहरात मल:निस्सारण प्रकल्प उभारणीसाठी १ हजार ४७५ कोटी ५० लाख रुपये, नाशिक शहरात गोदावरी काठावर रामकाल पथनिर्मितीसाठी १२० कोटी ८८ लाख रुपये, नाशिक महानगरपालिकेतर्फे ६८४ कोटी रुपये किंमतीची पाणीपुरवठा योजना विस्ताराचे काम प्रस्तावित आहे
No comments:
Post a Comment