.
मंत्री श्री. भरणे म्हणाले, ‘पीएम-किसान’ ही देशातील सर्वात व्यापक थेट आर्थिक सहाय्य योजना मानली जाते. योजनेमुळे शेतकऱ्यांच्या हातात नियमित अंतराने रोख रक्कम उपलब्ध होते, ज्यामुळे कर्जाची गरज कमी होते तसेच शेतीतील तातडीच्या खर्चाला मदत मिळते. मागील हप्त्यांमध्ये डीबीटी प्रक्रियेचे पारदर्शक व्यवहार, लाभार्थ्यांच्या माहितीचे आधार सीडिंग आणि बँक पडताळणीमुळे योजना अधिक सक्षम झाली आहे. तसेच, नियमित आर्थिक सहाय्यामुळे लहान व मध्यम शेतकऱ्यांना त्यांच्या हंगामी आर्थिक नियोजनात दिलासा मिळतो आणि शेतकरी कुटुंबांच्या उपजीविका सुरक्षित राहण्यास मदत होते."
No comments:
Post a Comment