Thursday, 6 November 2025

महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ प्रकल्पाचा शुभारंभ राष्ट्रीय विधी विद्यापीठ प्रकल्प उभारणीचा

 1

 

महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ प्रकल्पाचा शुभारंभ

राष्ट्रीय विधी विद्यापीठ प्रकल्प उभारणीचा ऐतिहासिक टप्पा

                          - भारताचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई

-----------

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील विधि शिक्षणाचे केंद्र बनेल

                                   - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 5 :  महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ प्रकल्प उभारणी हा ऐतिहासिक टप्पा आहे. राज्य शासनाने कायदा शिक्षणासाठी दाखविलेली बांधिलकी उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रात न्यायपालिकेच्या पायाभूत सुविधांचा दर्जा देशात सर्वोत्तमांपैकी एक आहेअसे प्रतिपादन भारताचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.

            मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते गोरेगाव (पश्चिम), मुंबई येथे महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी मुख्य न्यायमुर्ती भूषण गवई यांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे  प्र-कुलगुरू न्यायमूर्ती श्री चंद्रशेखरन्यायमूर्ती भारती डांगरेन्यायमूर्ती संदीप मर्नेराज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफसार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसलेविधि व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. दिलीप उकेलोकप्रतिनिधीअधिकारीशिक्षकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ  प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने मौल्यवान जागा उपलब्ध करून दिल्याचे नमूद करून हा प्रकल्प केवळ राष्ट्रीयच नव्हेतर आंतरराष्ट्रीय दर्जाचा ठरेलअसा विश्वास मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केला. मुख्य न्यायमूर्तींनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले कीकायद्याचे शिक्षण हे केवळ व्यवसाय नव्हेतर समाज परिवर्तनाचे साधन आहे. वकील हे समाज अभियंते आहेतजे सामाजिक आणि आर्थिक न्याय साकारतात.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi