Wednesday, 19 November 2025

भिक्षा प्रतिबंध कायद्यातील शब्दरचना बदलण्यास मान्यता

 भिक्षा प्रतिबंध कायद्यातील शब्दरचना बदलण्यास मान्यता

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध कायद्यातील मानहानीकारक शब्द वगळण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

            एका याचिकेवरील निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व अधिनियमनियमनियमावलीउपविधी इत्यादीमधील मानहानीकारक असे शब्द बदलण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर मुंबई भिक्षा प्रतिबंध अधिनियम1959 मधील कलम 9 व 26 मध्ये सुधारणा करण्याची शिफारस विधि व न्याय विभागाने केली आहे.  त्यानुसार या अधिनियमातील महारोगाने पिडीतकुष्ठरोगीकुष्ठालये असे  शब्द वगळण्यास व त्यानुषंगाने अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi