नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा बोधचिन्हासाठी स्पर्धेचे आयोजन
· २० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
· तीन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक
नाशिक, दि. २६ : श्रद्धा, पावित्र्य आणि अध्यात्माचा संगम असलेला सिंहस्थ कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणार आहे. यानिमित्त नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणातर्फे बोधचिन्ह स्पर्धेचे (लोगो डिझाईन) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे अनुक्रमे तीन, दोन आणि एक लाख रुपयांच्या पारितोषिकांसह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी २० डिसेंबर २०२५ पर्यंत प्रवेशिका पाठविता येणार असून देशभरातील जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment