इमारत देखभाल व दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून
सुमारे १९४ कोटी रुपयांच्या निधीचे वितरण
सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती
मुंबई, दि. २१ : इमारत देखभाल दुरुस्ती आणि नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीची कामे सुरळीत व्हावीत यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागपूर मंडळाकडे सुमारे १९४ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे.
या पैकी १५१ कोटी १९ लाख रुपयांचा निधी गेल्या वर्षीच देण्यात आला आहे. तो इमारत देखभाल दुरुस्तीसाठीचा आहे. तर नागपूरचे हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने करावयाच्या पूर्वतयारीसाठी २० कोटी आणि इमारत देखभाल दुरुस्तीसाठी आणखी २२ कोटी ७६ लक्ष असा या वर्षी एकूण ४२ कोटी ७६ लक्ष रुपयांचा निधी नागपूर विभागास वितरित करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment