Thursday, 27 November 2025

पुणे जिल्हा रुग्णालयाला तीन वाहनांची देणगी · सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण

 पुणे जिल्हा रुग्णालयाला तीन वाहनांची देणगी

·         सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण

 

मुंबईदि.२६ - गेस्टम्प ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनपुणे यांच्या संयुक्त उपक्रमातून महिला व बाल आरोग्यसुरक्षा आणि जनजागृती सेवा अधिक सक्षम करण्यासाठी पुणे जिल्हा रुग्णालयास तीन वाहनांचे देणगी स्वरूपात वितरण करण्यात आले. आरोग्य भवन येथे या वाहनांचे वितरण सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाले.

 

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले कीमहिला आणि बालकांच्या आरोग्यविषयक सेवांना अधिक वेग आणि परिणामकारकता देण्यासाठी उद्योग क्षेत्राचे असे सहकार्य अत्यंत मोलाचे आहे. या वाहनांमुळे आपत्कालीन सेवाजनजागृती मोहिमा आणि आरोग्य कार्यक्रमांची गतिमानता निश्चितपणे वाढेल.

 

कार्यक्रमाला होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. कॅरोलिन डीवाल्टरमुख्य संचालन अधिकारी शकील शेख उपस्थित होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी अँड परम आनंदवसीम शेख आणि सचिन करंजुले यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

सार्वजनिक-खासगी सहकार्यातून राबविण्यात आलेली ही पुढाकार योजना राज्यातील आरोग्यसेवा अधिक प्रभावीसक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी  सकारात्मक पाऊल ठरत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi