जनतेच्या मनात वसलेला 'विरु' हरपला!
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ
मुंबई , दि. 24: "सुप्रसिद्ध चित्रपट 'शोले'मधील आमचा लाडका 'विरु' हरपला. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे," अशा शब्दात अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.
बॉलिवूडचे ज्येष्ठ आणि लाडके अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. मंत्री श्री. झिरवाळ यांनी शोक संदेशात पुढे म्हटले, भारतीय चित्रपटसृष्टीतील 'ही-मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महान कलाकाराने हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांच्या जबरदस्त अभिनयामुळे ते चित्रपट रसिकांच्या मनात कायम जिवंत राहतील. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना केली.
No comments:
Post a Comment