Sunday, 9 November 2025

आई डे केअर संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा टेबल टेनिसमध्ये ऐतिहासिक विजय!

 आई डे केअर संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा टेबल टेनिसमध्ये ऐतिहासिक विजय!



पेण (रायगड), दि. 8 नोव्हेंबर 2025 :

आई डे केअर संस्था संचालित मतिमंद मुलांसाठी निवासी व्यवसाय शिक्षण-प्रशिक्षण केंद्र, रामवाडी पेण येथे शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी 16th महाराष्ट्र स्टेट टेबल टेनिस टुर्नामेंट, गोरेगाव येथे दणदणीत कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.


या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेतील 7 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि सर्वांनीच गोल्ड मेडल जिंकून संस्थेचा झेंडा उंचावला.


12 ते 15 वर्ष वयोगटात :


भावार्थ म्हात्रे — गोल्ड मेडल



16 ते 21 वर्ष वयोगटात :


तन्मय मोकल — गोल्ड मेडल


धनंजय चंदने — गोल्ड मेडल


यज्ञेश पाटील — गोल्ड मेडल



21 वर्षापुढील वयोगटात :


सुयोग पाटील — गोल्ड मेडल


प्रणव टिबे — गोल्ड मेडल


आदित्य रामकृष्णन — गोल्ड मेडल



ही सर्व विद्यार्थ्यांची कामगिरी अधिक कौतुकास्पद ठरते कारण एकूण सातही विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सर्वांनी सुवर्णपदक जिंकले!🥇


या यशामागे शाळेचे क्रीडा प्रशिक्षक व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक श्री. सिद्धांत म्हात्रे सर यांचे मार्गदर्शन तसेच संस्थेचे विश्वस्त यांचे सातत्यपूर्ण सहकार्य मोलाचे ठरले आहे.


आई डे केअर संस्था परिवारातर्फे सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 🎉👏

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi