भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या
युवक-युवतींसाठी मोफत प्रशिक्षण
मुंबई, दि.१९ : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदासाठी होणाऱ्या सर्विस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मुलाखतीची पूर्वतयारी करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात एसएसबी कोर्स क्रमांक ६४ आयोजित करण्यात आला आहे. हा कोर्स १५ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत होणार असून प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षण, निवास व भोजनाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी १० डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांनी सैनिक वेलफेअर विभाग, पुणे (डीएसडब्ल्यू) यांच्या संकेतस्थळावरून एसएसबी-६४ कोर्सचे प्रवेशपत्र व परिशिष्टे डाउनलोड करून पूर्ण भरून सोबत आणणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment