महाराष्ट्रात संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी
एसआयडीएम शी सकारात्मक चर्चा
- निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड
नवी दिल्ली, 19 : महाराष्ट्रात संरक्षण उद्योगातील गुंतवणूक वाढवण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड यांनी आज सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स (एसआयडीएम) च्या दिल्लीतील मुख्यालयात संस्थेचे डायरेक्टर जनरल रमेश आणि सीनियर डायरेक्टर भरत जैन यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत महाराष्ट्रातील संरक्षण उत्पादन क्षेत्रातील संधी, आगामी गुंतवणूक प्रकल्प, तसेच ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला अधिक वेग देण्यासाठी राज्य आणि सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स यांच्यातील संभाव्य सहकार्याच्या विविध विषयांवर चर्चा झाली .
सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स (एसआयडीएम) ही देशातील संरक्षण उत्पादकांची अग्रगण्य संस्था असून, भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्राला तांत्रिक, धोरणात्मक आणि औद्योगिक पातळीवर बळकटी देण्यासाठी कार्यरत आहे.
बैठकीनंतर निवासी आयुक्त श्री. गायकवाड म्हणाले, महाराष्ट्र हे देशातील संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे. सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स सारख्या संस्थांशी भागीदारीमुळे राज्यात नवीन संरक्षण प्रकल्प उभारणीला चालना मिळेल, रोजगारनिर्मिती वाढेल आणि ‘मेक इन इंडिया’ला नवीन ऊर्जा मिळेल.
No comments:
Post a Comment