बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर संशोधित बियाण्यांचा वापर आवश्यक
-पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. 19 : जागतिक हवामान बदलाचा मोठा परिणाम शेती क्षेत्रावर होत असून या वातावरणाला प्रतिरोध करणाऱ्या नवनवीन संशोधित वाणांची आवश्यकता वाढली आहे. शेतमालाची उत्पादकता वाढवायची असेल तर बदलत्या वातावरणानुसार बियाण्यांमध्ये संशोधन आणि त्यांचा वापर होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
जागतिक स्तरावरील बी-बियाणे उद्योगाच्या 'एशियन सीड काँग्रेस (एएससी) 2025' चे आयोजन मुंबई येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे-कुर्ला संकुल येथे करण्यात आले आहे. 17 तारखेपासून सुरू असलेल्या या परिषदेस पणन मंत्री जयकुमार रावल यांनी प्रमुख अतिथी म्हणून भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले, कृषी नवोन्मेष व बी-बियाणे उद्योग विकास क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी राहिला आहे. बदलत्या परिस्थितीनुसार संशोधित बियाणांची निर्मिती करणे आवश्यक असून यापुढेही राज्य शासन बियाणे उत्पादक कंपन्यांना सहकार्य करेल.
No comments:
Post a Comment