Monday, 3 November 2025

सर्व्हायकल कॅन्सर फ्री पुणे’ अभियानाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

 ‘सर्व्हायकल कॅन्सर फ्री पुणे’ अभियानाचा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

 

            मुंबई दि.३ : पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व्हायकल कॅन्सर फ्री पुणे अभियानाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे करण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुखपुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटीलपुणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारेउपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव डॉ.संतोष भोसलेसिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाजीविका फाउंडेशनयुनियन बँकअमेरिका - इंडिया फाउंडेशन या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

स्त्रियांमध्ये होणारा सर्व्हायकल कॅन्सर हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठ्या प्रमाणात आढळून येणारा आजार आहे. एचपीव्ही लस आणि वेळेवर केलेल्या स्क्रीनिंगमुळे या आजाराला प्रभावीपणे प्रतिबंध करता येऊ शकतो. त्यामुळे या आजाराच्या बाबतीत महिलांमध्ये जनजागृती करणे आणि लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याची गरज आहेअसे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi