उदंचन जलविद्युत प्रकल्पांचे परवाने जलदगतीने मिळण्यासाठी
फास्ट ट्रॅक यंत्रणा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· पंचमौली-देवळीपाडा उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी आठ हजार कोटींचा सामंजस्य करार
मुंबई, दि. 3 : पंचमौली-देवळीपाडा उदंचन जलविद्युत (धुळे/नंदुरबार) प्रकल्पासाठी हरियाणा येथील जीएससी पीएसपी महा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. राज्य शासनाने उदचंन जलविद्युत प्रकल्पातील गुंतवणूकदारांना जलवापर आणि पर्यावरणीय मंजुरीसह इतर सर्व परवाने जलदगतीने मिळावेत, यासाठी ‘फास्ट-ट्रॅक’ यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, जीएससी पीएसपी महा प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुमित नंदा, संचालक शुभ नंदा, मुख्य विपणन अधिकारी अनुप भटनागर, उपाध्यक्ष विमल सक्सेना, विधि सल्लागार विकास कुमार पाठक आदी उपस्थित होते. यावेळी दीपक कपूर आणि कंपनीचे अध्यक्ष सुमित नंदा यांनी करारावर स्वाक्षरी केल्या.
No comments:
Post a Comment