शासकीय जागेवरील गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासातील अडचणी दूर करणार
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. 19 : शासकीय जमिनीवरील गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकास प्रक्रियेला गती देण्याचे शासनाचे धोरण आहे. या अनुषंगाने स्वयं पुनर्विकासासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यात येतील, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण संस्था पुनर्विकास धोरणासंदर्भात मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय वांद्रे येथे बैठक झाली. या बैठकीस सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा आमदार प्रवीण दरेकर, राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, मुंबई शहर तसेच उपनगरातील खासदार, आमदार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, मुंबई शहर जिल्हाधिकारी आँचल गोयल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment