नागरिकांनी संविधानातील मूल्ये आचरणात आणावीत
- क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
मुंबई, दि. २६ : संविधान दिनानिमित्त क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी मंत्रालय परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी त्यांनी संविधानातील मूल्ये आचरणात आणावीत असे आवाहन नागरिकांना केले.
या वेळी क्रीडा मंत्री ॲड. कोकाटे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. त्यांनी सांगितले की, संविधान हे देशाच्या सर्वसमावेशक विकासाचे दिशादर्शन करणारे मार्गदर्शक तत्व आहे.
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment