Thursday, 6 November 2025

'वंदे मातरम सार्ध शताब्दी महोत्सव” दिनी 'वंदे मातरम्' सामूहिक गायनाचे आयोजन

  

'वंदे मातरम सार्ध शताब्दी महोत्सव दिनी

'वंदे मातरम्सामूहिक गायनाचे आयोजन

 

मुंबई,दि.6 : बंकिमचंद्र चटर्जी लिखित ऐतिहासिक वंदेमातरम गीताच्या लिखाणास 150 वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त   सांस्कृतिक कार्य मंत्री  ॲड. आशिष शेलार व कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री  मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून वंदे मातरम् सार्ध शताब्दी महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. महाराणा प्रताप औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुर्लामुंबई शहर व उपनगर येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9.45 ते 10.30 या कालावधीत वंदे मातरम सार्ध शताब्दी महोत्सव कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

 

       या कार्यक्रमासाठी खासदार वर्षा गायकवाडआमदार पराग  शाह  जिल्हाधिकारीतहसीलदार व अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात लघु नाटिकेच्या सादरीकरणाने होणार आहे. त्यानंतर डॉ.प्रेरणा प्रमोद क्षीरसागरराष्ट्र सेविका समिती कोकण प्रान्त बौध्दिक प्रमुख यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील 5000 हून जास्त विद्यार्थी एकाच वेळी उपस्थित राहून वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन करणार आहेत.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi