मेळाव्यात दोन वर्षे वयोगटापर्यंत मुलांसाठी वयोगटानुसार खेळणी आणि शैक्षणिक साहित्य दाखवले जाते, दोऱ्यांचे जुने पुंजके, साबणाचे बॉक्स, कागदी डबे या वापरलेल्या वस्तूंपासून तयार केलेल्या खेळांच्या माध्यमातून मुलांच्या पाचही इंद्रियांचा विकास करणे हा उद्देश होय. दोऱ्यांचे वापरलेले रिळ, टाकून दिलेली झाकणे, पुठ्ठा, बांगड्या, साबणाचे रिकामे कागदी डब्बे यापासून बनवलेली तोरणं, माळा, रंगीत खेळणी मुलांना मेळाव्यात खिळवून ठेवतात. खेळणाऱ्या मुलांबरोबर त्यांची आई आणि इतर पालकांचाही समावेश होतो. काही खेळ हे पालकांसाठी असतात.
या मेळाव्याच्या माध्यमातून बालकांशी संवाद साधण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. मुलांना विविध मुखवटे व टोपी घालून त्यांना आरशासमोर उभे केले जाते. जेणेकरून त्यांना स्वत:चा चेहरा पाहता येतो. अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून संवाद वाढवणे, मेंदूचा विकास, सामाजिक आणि भावनिक वाढ होण्यास मदत होते. याचबरोबर ब्रेन वायरिंग खेळाच्या माध्यमातून खेळ अनुभव आणि संवेदनाच्या आधारे मेंदूच्या न्यूरल कनेक्शनच्या निर्मिर्तीचे महत्त्व समजावतो. मुलाचा मेंदू पहिल्या १००० दिवसात सर्वाधिक वाढते म्हणून या काळात स्पर्श, संवाद आणि खेळ यावर भर दिला जातो. पालक मेळाव्यात मुलांसाठी बाहूली घर तयार केले जाते. यामध्ये कल्पनाशक्तीचा वापर करून खेळ खेळवले जातात. यामुळे त्यांच्या सामाजिक, भावनिक आणि बौद्धिक विकासाला चालना मिळते. पौष्टिक पोषण अंतर्गत सहा महिन्यांपर्यंत आणि त्यानंतरचे अन्न कसे असावे हे दाखवले जाते. तसेच जंक फुडचे दुष्परिणाम आणि स्थानिक फळभाज्यांचा उपयोग सांगितला जातो.
No comments:
Post a Comment