Thursday, 20 November 2025

महानगरात ‘सुविधा केंद्र’ मॉडेलने सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उत्तम कामाचे, स्वच्छता सेवा सुविधा

 मुंबईसारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या महानगरात सुविधा केंद्र मॉडेलने सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उत्तम कामाचे उदाहरण निर्माण केले आहे. ही केंद्रे शहराच्या आरोग्यसुरक्षेत मोठे योगदान देत आहेत. या सुविधा केंद्रामध्ये उत्तम सुविधा, लोकांचा सहभाग, वर्तणूक बदल, आर्थिक आणि पर्यावरण टिकाव आणि कार्यक्षम संचालन यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. हे सर्व अत्यंत उल्लेखनीय असून हा उपक्रम शहरी महाराष्ट्रासाठी आदर्शवत आहे.

उपक्रमाची वैशिष्ट्ये

सुरक्षित आणि सन्मानजनक स्वच्छता

झोपडपट्टी व अनौपचारिक वसाहतींतील महिलांसाठी सुरक्षित शौचालयमुलांसाठी स्वच्छ जागादिव्यांगांसाठी सुलभ रचना — या सर्व बाबींमुळे सुविधा केंद्रे अत्यंत लोकाभिमुख झाली आहेत.

पर्यावरणपूरक मॉडेल

जल-बचत तंत्रज्ञानऊर्जा कार्यक्षमता आणि कचरा व्यवस्थापन यामुळे पर्यावरणीय शाश्वततेचा उत्तम नमुना तयार झाला आहे.

समुदायातील महिलांचा सहभाग

प्रशिक्षित ३०० महिलांनी राबवलेल्या वर्तनबदल मोहिमेमुळे ७.५ लाख नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण मिळाले. यामुळे नागरिकांच्या सवयीवापर आणि आरोग्य-जाणीवेत सकारात्मक बदल घडला.

आरोग्यदायी परिणाम

सुविधा केंद्रांमुळे जठरांत्रअतिसार आणि मूत्रमार्गाच्या संक्रमणात ५० टक्के घट झाली आहे. झोपडपट्टी क्षेत्रातील सर्वाधिक समस्या असलेल्या दूषित पाणी व अस्वच्छतेमुळे होणारे आजार आता लक्षणीयरित्या कमी झाले आहेत.

आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण मॉडेल

सुरुवातीपासून ९ महिन्यांत केंद्र स्वतःचा खर्च भागवू लागते ही या योजनेची मोठी ताकद आहे. आज मुंबईतील सर्व २३ केंद्रे पूर्णपणे स्वयं-टिकाऊ आहेत.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi