“मुंबईची संस्कृती खंबीर आहे; ती थांबत नाही, खचत नाही”
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 26/11 हल्ल्यात मुंबईची संस्कृती, तिचा आत्मा आणि तिची ओळख लक्ष्य करण्यात आली होती. पण मुंबई थांबली नाही आणि खचली नाही. आपण या हल्ल्याला ठाम प्रत्युत्तर दिले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला दिलेले उत्तर हे देशाच्या बदललेल्या सामर्थ्याचे द्योतक आहे.
सदानंद दाते आणि नीता अंबानी यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी सांगितले की, “अशा व्यक्तींचा देशाला अभिमान आहे.”
कार्यक्रमात 26/11 हल्ल्यात अतुलनीय धैर्य दाखवणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख डॉ. सदानंद दाते यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कामा रुग्णालयातील ग्रेनेड हल्ल्यात गंभीर जखमी असूनही त्यांनी मागे न हटता अतिरेक्यांचा सामना केला आणि त्यांचा शेवट केला.
शांतीदूत म्हणून काम करत असलेल्या आणि समाजामध्ये सकारात्मकता निर्माण करणाऱ्या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच 26/11 हल्ल्यात अतुलनीय शौर्य दाखवणारे आणि ‘जिंदा शहीद’ म्हणून ओळखले जाणारे सुनिल जोधा यांनाही गौरवण्यात आले. श्री जोधा यांनी या हल्ल्यावेळी शरीरावर 20 गोळ्या झेलल्या ज्यातील एक आजही त्यांच्या शरीरात आहे.
या कार्यक्रमामध्ये पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनाही सन्मानित करण्यात आले तसेच 26/11 या हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांनाही सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास, नाविन्यता आणि रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, मुकेश अंबानी, यांच्यासह बॉलिवूड मधील कलाकार आणि मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment