Saturday, 29 November 2025

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यासाठी मुदतवाढ

 मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकार पुरस्कारासाठी

प्रवेशिका पाठविण्यासाठी मुदतवाढ

 

मुंबई, दि.25 : मंत्रालय आणि वार्ताहर संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरवण्यात येते. सन २०२५ च्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारकरिता आपली प्रवेशिका पाठवण्यासाठी  ०१ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुकांनी पुढील पत्त्यावर आपल्या प्रवेशिका पाठवाव्यातअसे आवाहन मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने करण्यात आले आहेत.

१) जीवनगौरव पुरस्कार - (राज्यस्तरीय)- एक२) उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (राज्यस्तरीय ) - वृत्तपत्र प्रतिनिधी- एकवृत्तवाहिनी माध्यम प्रतिनिधी पुरस्कार -एकआणि ३) उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (केवळ मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांकारिता ) एकअशा एकूण चार पुरस्कारांचा समावेश आहे.

 

१) कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार

जेष्ठ पत्रकारांचे पत्रकारितेतील योगदान किमान २५ वर्षे असावे. त्यांचे वय ६० वर्षे पूर्ण असावे. पत्रकाराने राज्यस्तरावर पत्रकारिता क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य पाहून पुरस्कारासाठी निवड केली जाईल. तसेच राज्यातील पत्रकारविविध पत्रकार संघटना व अन्य मान्यवर व्यक्ती यांच्या शिफारशीही विचारात घेण्यात येतील. यापूर्वी जेष्ठ पत्रकार श्री. वसंत देशपांडेश्री. विनायक बेटावदकरकै. विजय वैद्य आणि कै. दिनू रणदिवे आणि श्री.दिनकर रायकर श्री.कुमार केतकर श्री.अजय वैद्यश्री पंढरीनाथ सावंत आणि श्रीमती प्रतिमा जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

 

2) राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (दोन)

सदर पुरस्कार वृत्तपत्र प्रतिनिधी व वृत्तवाहिनी माध्यम प्रतिनिधी यांना प्रत्येकी एक याप्रमाणे देण्यात येतो. पत्रकारितेत पूर्णवेळ सेवा बंधनकारक आहे. यामध्ये पत्रकारांना भाषेचे बंधन राहणार नाही. वृत्तपत्र माध्यम प्रतिनिधीना मागील दोन वर्षाच्या बातम्या /लेख यांची कात्रणेतर वृत्तवाहिनी माध्यम प्रतिनिधीना चित्रफित/ध्वनीफित (पेनड्राईव्ह) देणे बंधनकारक राहील. यावर अर्जदारांचे नाव तसेच संपादक किंवा संस्थेचे प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडून प्रवेशिका सांक्षाकित केलेली असावी.

 

3) उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (एक)

या पुरस्कारासाठी केवळ मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांनाच सहभाग घेता येईल. अर्जदाराने दि. ०१ जानेवारी २०२५ पासून ते अर्ज करण्याच्या दिनांकपर्यत कात्रणे/ध्वनीफित/चित्रफीतसह प्रवेशिका द्याव्यात.

पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांनी आपल्या नामांकनाच्या प्रवेशिका अन्यथा मान्यवरांच्या शिफारशी तपशीलवार माहितीसह पुढील पत्त्यावर येत्या ०१ डिसेंबर २०२५ पर्यत पाठवण्यात याव्यात. चारही पुरस्कार निवडताना पुरस्कार निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.

प्रवेशिका पाठविण्याचा पत्ता मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघतळमजलापत्रकार कक्षमंत्रालयमुंबई ४०००३२ किंवा mahamantralaya@gmail.com

अध्यक्ष: दिलीप सपाटे सरचिटणीस: दीपक भातुसे

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi