गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा
एकही पात्र गिरणी कामगार घरापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश
- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटक
मुंबई, दि. २० : एकही पात्र गिरणी कामगार हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
कोल्हापूर जिल्ह्यातील गिरणी कामगारांच्या घरांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता यांच्यासह म्हाडा, नगर विकास विभागाचे अधिकारी व कोल्हापूर जिल्ह्यातील गिरणी कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment