Wednesday, 19 November 2025

मुंबई, उपनगरातील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या पुनर्विकासाचे धोरण निश्चित

 मुंबईउपनगरातील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या पुनर्विकासाचे धोरण निश्चित

 

मुंबई आणि उपनगरातील वीस एकर किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्रफळावरील म्हाडाच्या प्रकल्पांच्या एकत्रित-समूह पुनर्विकासाच्या सर्वंकष धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यातून मुंबई शहर व उपनगर क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे उपलब्ध होणार आहेत.

म्हाडाच्या मुंबई मंडळाने मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) व अल्प उत्पन्न गटातील (एलआयजी) नागरिकांसाठी 1950 ते 1960 च्या दरम्यान 56 वसाहतींची निर्मिती केली. या वसाहतींमध्ये सुमारे 5 हजार सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत.  यातील इमारतींचे बांधकाम जुने झाल्याने इमारती जीर्ण व मोडकळीस आल्याचे निदर्शनास आल्याने म्हाडाने या इमारतींच्या एकत्रित-समूह पुनर्विकासाचे धोरण तयार केले आहे.  या धोरणानुसार 20 एकर आणि त्यापेक्षा अधिकच्या क्षेत्रफळावरील प्रकल्पांचा म्‍हाडा एकत्रित-समूह पुनर्विकास करणार आहे. या पुनर्विकासामुळे मूलभूत सोयीसुविधा या अत्याधुनिक स्वरूपाच्या उपलब्ध होणार आहेत.  ज्यामध्ये आधुनिक सुविधांनी युक्त सदनिकालिफ्टप्रशस्त वाहनतळउद्यानसभागृहखेळाचे मैदानेव्यायामशाळाजलतरण तलावसीसीटीव्ही सुविधा यांचा समावेश आहे.  या परिसरात पाणीपुरवठासांडपाणी निचरारस्तेवीज आदी पायाभूत सुविधा अत्याधुनिक संरचनेच्या  तसेच पर्यावरणपूरक असणार आहेत. यामुळे रहिवाशांना पूर्वीपेक्षा मोठी घरे उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्प आराखड्यामध्ये हरित क्षेत्रशाळाआरोग्य सुविधावाणिज्यिक जागा असे संपूर्ण वसाहतीचे एकत्रित नियोजन केले जाणार आहे. या धोरणानुसार उच्चतम पुनवर्सन चटईक्षेत्र उपलब्ध होणार असल्याने रहिवाशांची संमती घेणे आवश्यक राहणार नाही.  तथापिनिविदा प्रक्रियेतून नियुक्त करण्यात येणाऱ्या विकासकास गृहनिर्माण संस्थांचा सहमतीदर्शक ठराव घेणे बंधनकारक राहणार आहे. या पुनर्विकासासाठी मुंबई मंडळाच्या अखत्यारितील ११४ प्रकल्पांसाठी म्हाडा नियोजन प्राधिकरण राहणार आहे. गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदत्त समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi