कल्याण मुरबाड माळशेज मार्गावरील काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाचे स्पष्टीकरण
मुंबई, दि. २६ : कल्याण मुरबाड माळशेज घाट मार्गात राष्ट्रीय महामार्गामार्फत काम सुरू आहे. हा मार्ग डोंगराळ प्रदेशाचा उंच व चढ उतार व नागमोडी वळण अशा प्रकाराचा असल्याने कामे करताना वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच हा रस्ता सुस्थितीत ठेवण्याबाबत व काम जलदगतीने पूर्ण करण्याबाबत कंत्राटदाराला वेळोवेळी कळविण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे.
मुरबाड-माळशेज घाट रस्त्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाने स्पष्ट केले आहे, कल्याण मुरबाड निर्मल राष्ट्रीय महामार्ग क्र. 61 चे किमी 9/300 ते ९/८०० व किमी ११/७०० ते १०१/००० लांबी ही या विभागाच्या हद्दीत येते. कल्याण मुरबाड निर्मल महामार्गाचे उन्नतीकरण करण्याचे काम किमी १५.२०० ते ३८.००० (चौपादरीकरण काँक्रिटीकरण) व किमी ५८.०० ते ८४.०० (दुहेरी काँक्रिटीकरण) मध्ये सुरु आहे. त्यापैकी किमी १५. २०० ते किमी ३८.०० या लांबी मध्ये किमी १५.७२२ चौपादरीकरण (१६ /९१० (रायते) ते कि.मी. १८/६८० (गोवेली) वगळून] व किमी ५८.०० ते किमी. ६३.०० मधील महामार्गाचे रस्त्याचे दुपदरीकरण, काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून त्यावरून दुहेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. तसेच हा रस्ता सुस्थितीत ठेवण्याबाबत संबंधित कंत्राटदाराला वेळोवेळी कळविण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment