जुन्नर व शिरूर परिसरातील बिबट्यांचे तातडीने स्थलांतर करणार
- वनमंत्री गणेश नाईक
वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी महत्वाचे निर्णय
· त्वरित 200 पिंजरे बसविणार, आणखी 1 हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करणार
· नागरिकांच्या जीवित रक्षणासाठी निधी कमी पडू देणार नाही
· बिबट्यांच्या हालचालीची माहिती देण्यासाठी एआयचा वापर करणार
· नसबंदीसाठी केंद्रीय वन मंत्र्यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटणार
· शेती व गोठ्यांना सौर कुंपण करणार
मुंबई, दि.4 : पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरुर परिसरातील बिबट्यांमुळे मनुष्यहानी होणे ही दुर्देवी घटना आहे. यावर दीर्घ व तातडीच्या उपाययोजना करण्यात येतील. या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी 200 पिंजरे तातडीने लावण्यात येतील. आणखी एक हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करण्यात येणार आहेत. या परिसरातील बिबट्यांना पकडून त्यांचे तातडीने स्थलांतर करण्यात येईल. तसेच बिबट्यांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी सॅटेलाईट आधारित कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून 'अर्लट' देण्यात येईल, अशी माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली.
No comments:
Post a Comment