Saturday, 29 November 2025

भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चित्ररथाच्या माध्यमातून संविधान प्रदर्शन

 भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त

चित्ररथाच्या माध्यमातून संविधान प्रदर्शन

 

मुंबईदि. 26 :- भारतीय संविधान सभेने भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत केली त्यानंतर ती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली आणि भारतीय इतिहासात एका नव्या युगाची सुरुवात झाली. हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी महत्त्वाचा आहेभारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने राज्यभरात 36 जिल्ह्यांमध्ये चित्ररथ प्रदर्शन आयोजित करण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.

या चित्ररथाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधानावर आधारित चित्ररथाचे प्रदर्शन 36 जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार आहे. संविधानावर आधारित चित्ररथ सादरीकरणामुळे भारतीय संविधानाचे महत्त्व आणि मूल्ये लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi