संविधान दिनानिमित्त'
‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रा. विजय मोहिते यांची विशेष मुलाखत
मुंबई, दि.25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमाच्या ‘संविधान दिन’ विशेष भागांतर्गत सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई येथील संविधान व इतिहास विषयाचे अभ्यासक प्रा. विजय मोहिते यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
'दिलखुलास' कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 26. गुरूवार दि. 27 आणि शुक्रवार दि. 28 नोव्हेंबर 2025 या तीन दिवसात, दररोज सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News on AIR’ या मोबाईल अॅपवर प्रसारित होईल. ही मुलाखत निवेदिका शिबानी जोशी यांनी घेतली आहे.
भारताचे संविधान हा आपल्या देशाचा सर्वोच्च व मार्गदर्शक कायदा असून राष्ट्राची शासनव्यवस्था, राजकीय रचना, शासनसंस्थांचे अधिकार-कर्तव्ये, तसेच नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये यांची स्पष्ट चौकट ते निर्धारित करते. जगातील सर्वात मोठे लिखित संविधान म्हणून भारतीय संविधानाची विशेष ओळख आहे. संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर रोजी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून या विषयावरील विशेष मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रा. विजय मोहिते यांनी संविधान निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भारतीय संविधानाचा प्रवास, लोकशाही मूल्यांची अंमलबजावणी व आजच्या पिढीसमोरील आव्हाने, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये, तसेच आधुनिक समाजातील संविधानाची उपयुक्तता अशा महत्त्वपूर्ण मुद्यांवर मार्गदर्शन केले आहे.
No comments:
Post a Comment