Sunday, 23 November 2025

सजग आणि सतर्क राहून देश सुरक्षेचे कान आणि डोळे व्हावे

 शौर्यशांतता आणि जागरूकतेचा संदेश देत ग्लोबल पीस ऑनर’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

नागरिकांनी सजग आणि सतर्क राहून देश सुरक्षेचे कान आणि डोळे व्हावे

   - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय तपास यंत्रणा प्रमुख डॉ. सदानंद दाते आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी याचा ग्लोबल पीस ऑनरने सन्मान

 

मुंबईदि. 22 - दहशतवादाविरुद्धचे युद्ध संपलेले नाही. या दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग आणि सतर्क असले पाहिजे. कान आणि डोळे बनून सुरक्षेचे काम केले पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दिवीजा फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल पीस ऑनर कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख     डॉ. सदानंद दातेएनएसजी कमांडो सुनिल जोधारिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांचा ग्लोबल पीस ऑनर सन्मानाने गौरवण्यात आले.

26/11 या काळजाला भिडणाऱ्या घटनेला 17 वर्षे झाली असली तरी त्या दिवसाची वेदना आजही आपणा सर्वांच्या मनात कायम असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीमुंबईसह देशभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या हल्ल्यातील शहीदांना आदरांजली देण्यासाठी आणि हुतात्म्यांच्या स्मृती ताज्या ठेवण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. पहलगाम येथे निष्पाप नागरिकांची हत्या करून दहशतवादी संघटना देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा घटनांवरून आजही दहशतवादाचा धोका कायम असल्याचे स्पष्ट होत असूनप्रत्येक नागरिकाने सतर्क राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले..

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi