Saturday, 22 November 2025

शासकीय जागेवरील गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासातील अडचणी दूर करणार

 शासकीय जागेवरील गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासातील अडचणी दूर करणार

-         महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. 19 : शासकीय जमिनीवरील गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकास प्रक्रियेला गती देण्याचे शासनाचे धोरण आहे. या अनुषंगाने  स्वयं पुनर्विकासासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यात येतीलअसे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण संस्था पुनर्विकास धोरणासंदर्भात मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय वांद्रे येथे बैठक झाली. या बैठकीस सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलारकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेस्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा आमदार प्रवीण दरेकरराज्यमंत्री डॉ.पंकज भोयरमुंबई शहर तसेच उपनगरातील खासदारआमदारमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेकोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशीमुंबई शहर जिल्हाधिकारी आँचल गोयलमुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi