Thursday, 6 November 2025

न्यायालये केवळ इमारती नसून लोकशाही मूल्यांचे प्रतीक

 न्यायालये केवळ इमारती नसून लोकशाही मूल्यांचे प्रतीक

                                    - भारताचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई

 

वांद्रे पूर्व येथे उच्च न्यायालय संकुलांची पायाभरणी व कोनशीलाचे अनावरण

लोकशाही मूल्यांचे प्रतिबिंब असलेली भव्य न्यायालयीन इमारत उभारूया

                                                 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. 5: न्यायालयीन इमारती या केवळ भव्य नसाव्याततर त्या न्यायसमानताबंधुता आणि स्वातंत्र्य या संविधानातील मूल्यांचे मूर्त रूप असाव्यात. त्या प्रत्येक नागरिकाला न्यायप्रवेश सुलभ करणाऱ्या ठराव्यातअसे प्रतिपादन भारताचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.

उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलांच्या पायाभरणी आणि कोनशिला अनावरण कार्यक्रम वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहत परिसरात पार पडला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारसार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले तसेच न्यायव्यवस्थाप्रशासन आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती गवई म्हणाले कीन्यायालयीन इमारतींचे बांधकाम हे केवळ वास्तुशास्त्राचे उदाहरण नसूनत्या देशातील लोकशाही मूल्ये आणि न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास टिकवून ठेवणाऱ्या संस्था आहेत. ही इमारत फक्त वास्तू नाहीतर न्याय आणि पारदर्शकतेचे मंदिर आहे. येथे नागरिकवकील आणि न्यायाधीश या सर्वांना समसमान सुविधा मिळतील. प्रत्येक प्रकल्पामध्ये पर्यावरणपूरक आणि हरित वास्तुकलेचा विचार करण्यात आला आहे. महाराष्ट्र नेहमीच पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर राहिला आहे. राज्य शासनाकडून न्यायव्यवस्थेच्या गरजांनुसार आधुनिक इमारतीतंत्रज्ञान आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. राज्याच्या न्यायसंस्थेचे प्रतीक असलेले एक आधुनिक आणि वैभवशाली बांधकाम असेल, अशा शब्दात त्यांनी उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाचे वर्णन केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi