Monday, 10 November 2025

मुलांना हवे मानसिक स्वातंत्र्य

 मुलांना हवे मानसिक स्वातंत्र्य !

महिला व बालविकास विभाग आणि युनिसेफ

बालकांच्या शारीरिक आरोग्याबरोबर जपतंय मानसिक आरोग्यही !


महिला व बालविकास विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांच्या मानसिकशारीरिक आणि कौंटुबिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्यातील अंगणवाड्यामंध्ये पालक मेळावा आयोजित करण्यात येतो. याचा सकारात्मक परिणाम होताना दिसतो. आरंभ या कार्यक्रमाच्या तीन मुख्य व्यासपीठांपैकी एक म्हणजे पालक मेळावा. घरभेटी आणि मातामंडळ बैठकांबरोबरच पालक मेळाव्याचा उद्देश म्हणजे संपूर्ण समुदायाने एकत्र शिकणे आणि मुलांच्या संगोपनाबद्दल आई बरोबर वडील आणि कुटुंबातील सदस्यांनी जागरूक होणे आवश्यक आहे.

महिला व बालविकास विभागामार्फत महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात. याप्रमाणे युनिसेफ ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक संस्था आहे जी मुले आणि मातांची कल्याणासाठी काम करते. तिचे मुख्य उद्दिष्ट म्हणजेजगभरातील मुलांना अन्नआरोग्य सेवाशिक्षण आणि संरक्षण उपलब्ध करून देणेआपत्तीयुद्ध किंवा दारिद्र्यग्रस्त भागातील मुलांना मदत करणेलसीकरणस्वच्छ पाणी आणि शिक्षणाच्या कार्यक्रमांद्वारे मुलांचे जीवन सुधारणे यासाठी १९४६ साली दुसऱ्या महायुद्धानंतर युद्धग्रस्त देशांतील मुलांना मदत करण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi