निवडलेल्या 60 फुटबॉलपटूंना महाराष्ट्र सरकारतर्फे पाच वर्षांची विशेष शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे. तसेच या तरुणांना 14 डिसेंबर रोजी जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्याकडून प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमाला मित्र चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, विफा चे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, मित्र चे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील पांढरे, नवनाथ फडतरे, युनिसेफ इंडियाच्या प्रमुख सिंथिया मॅकेफ्रे, युनिसेफ महाराष्ट्राचे प्रमुख संजय सिंह तसेच व्हीएसटीएफ चे सह मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीपसिंह बायस गोट टूर प्रमोटर सत्तादूर दत्ता उपस्थित होते.
भारत 2034 फिफा वर्ल्ड कपसाठी पात्र ठरेल, तेव्हा राष्ट्रीय संघात किमान पाच खेळाडू महाराष्ट्रातील असावेत, या दृष्टीने राज्य सरकार आणि क्रीडा विभाग विशेष प्रयत्नशील आहेत. क्रीडा विभाग, मित्रा, विफा, विएसटीएफ आणि अन्य संस्थांच्या सहकार्याने ‘प्रोजेक्ट महा-देवा’ महाराष्ट्रातील फुटबॉलप्रेमी तरुणांना जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा निर्णायक उपक्रम ठरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
No comments:
Post a Comment