Saturday, 22 November 2025

विकसित भारत @2047’ च्या संकल्पात महाराष्ट्राचे लक्षणीय योगदान

 विकसित भारत @2047’ च्या संकल्पात महाराष्ट्राचे लक्षणीय योगदान

- केंद्रीय उद्योग मंत्री  पियुष गोयल

 

            नवी दिल्ली, 19 : नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर सुरू असलेल्या 44 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्र दालनास भेट दिली. यावेळी त्यांनी राज्याच्या सर्वसमावेशक व सतत प्रगती करणाऱ्या विकास मॉडेलचे कौतुक केले आणि विकसित भारत @2047’ च्या राष्ट्रीय संकल्पात महाराष्ट्राचे योगदान अत्यंत महत्त्वाचे व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले.

 

            केंद्रीय उद्योग मंत्री  गोयल यांनी महाराष्ट्र दालनातील प्रत्येक विभागास भेट दिली.  आणि कारागिरस्वयं-सहाय्यता गटातील महिला उद्योजिका तसेच नवउद्योजकांशी थेट संवाद साधला. पैठणी साड्याकोल्हापुरी चप्पलवारली पेंटिंगहाताने रंगवलेल्या चामड्याच्या वस्तूग्रामीण महिलांनी तयार केलेले ताजे पारंपरिक पदार्थऑर्गॅनिक उत्पादने आणि मराठी भाषा दालन’ यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी मैत्री कक्ष उद्योग विभागातील उज्ज्वल सावंत व प्रियदर्शनी सोनार ह्यांनी मैत्री कक्षा ची माहिती दिली.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi