Friday, 14 November 2025

धानोरा तालुक्यातील 10 शाळांसाठी सोलर प्रकल्पास मंजुरी

 धानोरा तालुक्यातील 10 शाळांसाठी सोलर प्रकल्पास मंजुरी

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी 31 ऑक्टोबर 2025 रोजी 'सोलर शाळा प्रकल्पा'अंतर्गत रोझी ब्लू फाऊंडेशनला काम करण्यास मंजुरी दिली.

पहिल्या टप्प्यात फाऊंडेशनने धानोरा तालुक्यातील दहा जिल्हा परिषद शाळांमध्ये सौर ऊर्जेवर आधारित युनिट्स उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरामुसक्यासालेभट्टीरांगीनिमगावदुडमलामुरूमगावबन्धोनातसेच जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा आणि मोहली या शाळांचा समावेश आहे.

या प्रकल्पामुळे शाळांमधील अध्यापन व डिजिटल शैक्षणिक उपक्रमांना वीज पुरवठ्यावरील अवलंबन कमी होऊन अखंड सुविधा मिळेल व या शाळांमधील सुमारे 1,470 विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ होईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 'रोझी ब्लू फाउंडेशन'च्या संचालिका श्लोका अंबानी यांच्या संयुक्त सहकार्यातून सुरू झालेला सोलर शाळा प्रकल्प’ हा गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण प्रणालीसाठी टिकाऊस्वच्छ आणि विश्वसनीय ऊर्जा पुरविणारा नवा आदर्श ठरत आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi