भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी सुवर्णसंधी
एस.एस.बी. कोर्ससाठी मोफत प्रशिक्षणtraining.petenashik@gmail.com), दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 किंवा व्हॉट्सअॅप नंबर 9156073306 वर
मुंबई दि. १८ : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ ते १२ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एस.एस.बी. (SSB) कोर्स क्र. ६३ आयोजित करण्यात आला आहे. या कोर्समध्ये प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास आणि भोजनाची सोय करण्यात आली आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी दिनांक २० ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे मुलाखतीस हजर रहावे. उमेदवारांनी सैनिक कल्याण विभाग (Department of Sainik Welfare, Pune) च्या वेबसाईटवरून SSB-६३ कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबतची परिशिष्टे डाउनलोड करून ती पूर्ण भरून, मुलाखतीच्या दिवशी सोबत आणणे आवश्यक आहे.
पात्रता
या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे पुढीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे:
1. कंबाईंड डिफेन्स सर्विसेस एक्झामिनेशन(CDSE-UPSC) किंवा नॅशनल डिफेन्स अकेडमी एक्झामिनेशन(NDA-UPSC) परीक्षा उत्तीर्ण, तसेच सर्विसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखतीसाठी पात्रता प्राप्त केलेली असावी.
2. एनसीसी ‘C’ प्रमाणपत्र ‘A’ किंवा ‘B’ ग्रेडसह उत्तीर्ण, आणि एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरकडून यस एस एस बी SSB साठी शिफारस मिळालेली असावी.
3. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स साठी (Technical Graduate Course) साठी SSB कॉल लेटर असणे आवश्यक.
4. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी SSB कॉल लेटर किंवा शिफारस यादीत नाव असलेले असावे.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे ईमेल (training.petenashik@gmail.com
००००००००
दि.
No comments:
Post a Comment