मोदी म्हणजे देशाचे वर्तमान आणि भविष्य”
_उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्रधानमंत्री “नरेंद्र मोदी हे फक्त एक व्यक्तिमत्व नाहीत, तर देशाचे वर्तमान आणि भविष्य आहेत. त्यांच्या कामगिरीचा प्रवास संघर्षमय असून, तो प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे,” असे उद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मोदीज मिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी काढले.
हे पुस्तक फक्त नरेंद्र मोदींच्या चरित्राचे वर्णन नाही, तर त्यांच्या कार्याची सत्यकथा आहे. मोदींच्या व्यक्तिमत्वाची व्याप्ती एका पुस्तकात सामावणे शक्य नाही, कारण त्यांनी अशक्याला शक्य करून दाखवले आहे. मागील अकरा वर्षांत भारतात झालेले सकारात्मक बदल जगभरात कौतुकास्पद ठरले आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
जगातील अर्थव्यवस्था डगमगली असतानाही भारताची अर्थव्यवस्था चौथ्या स्थानी आली आहे आणि तिसरे स्थान मिळविण्याचे स्वप्न साकार होईल. ‘डिजिटल इंडिया’, ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ यांसारख्या उपक्रमांचा उल्लेख करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढणे, महिलांना आत्मनिर्भर बनविणे, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणे, हे सर्व मोदींच्या नेतृत्वामुळे शक्य झाले.
या कार्यक्रमात "मोदीज मिशन" पुस्तकाचे लेखक बर्जिस देसाई यांनीही विचार मांडले.
No comments:
Post a Comment