Sunday, 19 October 2025

पब्लिक पॉलिसी” म्हणजे धोरणनिर्मिती तर “पब्लिक ॲडमिनीस्ट्रेशन” म्हणजे अंमलबजावणी, हे दोन्ही घटक

 पब्लिक पॉलिसी म्हणजे धोरणनिर्मिती तर पब्लिक ॲडमिनीस्ट्रेशन म्हणजे अंमलबजावणीहे दोन्ही घटक परस्परपूरक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ॲडमिनीस्ट्रेशन म्हणजे लोकसेवा – नागरिककेंद्रितसर्वसमावेशक आणि संवेदनशील शासन हेच खरे सुशासन, असे ते म्हणाले. नाविन्यपूर्ण काम केल्याबद्दल डॉक्टर गडकरी मेमोरियल अवॉर्ड २०२५ श्री. हर्ष पोद्दार२०२४ विजयालक्ष्मी बिद्री यांना देण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

त्यांनी मॅन्युअल ऑफ ऑफीस प्रोसीजर आणि मॅन्युअल ऑफ गुड गव्हर्नन्स यांचा संदर्भ देत शासनातील कामकाज अधिक कार्यक्षम व अद्ययावत करण्याची गरज अधोरेखित केली. तसेच महाराष्ट्रातील नवोपक्रमांचे उदाहरण देताना मार्व्हस या एआय प्लॅटफॉर्मसाठी आयपीएस अधिकारी हर्ष पुणताळ आणि ई-पंचनामा प्रणालीसाठी विजयालक्ष्मी बेर्त्री यांचा गौरव केला.

अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी आपल्या मनोगतात सांगितले कीनागरिक आणि शासन यांच्यातील नाते अधिक जबाबदार आणि पारदर्शक बनले आहे. नागरिक आता केवळ लाभार्थी नसून शासनाच्या कामकाजावर सक्रिय देखरेख ठेवतात. निकाल-केंद्रित कामकाज हीच आजची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi