Wednesday, 1 October 2025

देवस्थानच्या शेतजमिनींचे मॅपिंग करून जिल्हानिहाय याद्या तयार करा

 देवस्थानच्या शेतजमिनींचे मॅपिंग करून जिल्हानिहाय याद्या तयार करा

विधि व न्याय राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल

 

मुंबईदि. ३०: राज्यामध्ये देवस्थानच्या शेतजमिनी आहेत. या जमिनी हडपण्याच्या बऱ्याच तक्रारी येत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी देवस्थानच्या जमीन शेतजमिनींचे मॅपिंग करून त्याच्या जिल्हा निहाय याद्या तयार कराव्यात असे निर्देश विधि व न्याय राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

 

बैठकीस विधि व न्याय विभागाच्या अवर सचिव मनीषा कदममहाराष्ट्र मंदिर महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल म्हणालेदेवस्थानच्या शेतजमिनी बाबत संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पोर्टलवर माहिती घेण्यात यावी जिल्हाधिकारी कार्यालयात या विषयासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. अतिक्रमित तसेच हडपलेल्या देवस्थानच्या शेतजमिनी मोकळ्या करण्यात याव्यात. देवस्थानच्या शेत जमिनींबाबत झालेल्या व्यवहाराची धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी.

 

देवस्थान जमिनीच्या ७/१२ वर चुकीच्या नोंदणी करण्यात आल्या असल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने धर्मदाय आयुक्त यांनी तपासणी करावी. तपासणीचा अहवाल सादर करावा. देवस्थान शेत जमिनी बाबत अवैधरित्या झालेला फेरफार हा अवैधच मानला जाईल. अशा फेरफारची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईलअसेही विधि व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

 

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात 245 देवस्थाने आहेत ही देवस्थाने समितीच्या कार्यक्षेत्रातून उघडण्याबाबत पडताळून कार्यवाही करण्यात यावीअसेही विधि व न्याय राज्यमंत्री ॲड जयस्वाल यांनी निर्देशित केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi