‘दिलखुलास’ ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात
अल्पसंख्यांक विकास विभागाचे सचिव रूचेश जयवंशी यांची मुलाखत
मुंबई, दि. 27: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 'अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना व उपक्रम' या विषयावर अल्पसंख्यांक विकास विभागाचे सचिव रूचेश जयवंशी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
'दिलखुलास' कार्यक्रमात ही मुलाखत गुरूवार दि. 29 शुक्रवार, दि.30 आणि शनिवार, दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ या मोबाईल अॅपवर ऐकता येणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर देखील उपलब्ध होईल. ही मुलाखत निवेदिका शिबानी जोशी यांनी घेतली आहे.
X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR
Facebook : https://www.facebook.com/
YouTube : https://www.youtube.com/
राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागामार्फत राज्यातील अल्पसंख्यांक समाजासाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. शासनाच्या ‘सर्वांसाठी विकास’ या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी या योजना महत्त्वपूर्ण ठरत आहेत. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, मुक्त व निवासी विद्यालये, तसेच व्यावसायिक प्रशिक्षण व रोजगार क्षमतेसाठी विशेष प्रोत्साहन कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वयंरोजगाराच्या योजना तर युवकांसाठी ‘कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविले जात आहेत. त्याचबरोबर, अल्पसंख्याक समाजातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व्याजमुक्त कर्ज योजना, भांडवली अनुदान योजना, आणि व्यवसाय मार्गदर्शन उपक्रम सुरू आहेत. या योजना यांची अंमलबजावणी याविषयी सविस्तर माहिती सचिव श्री. जयवंशी यांनी 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात दिली आहे.
००००
No comments:
Post a Comment