Thursday, 23 October 2025

संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख

 संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख

                                                                                    - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्पास मिहान मधील 223 एकर भूखंडाचे हस्तांतरण

 

 नागपूरदि. 23 : सोलर डिफेंस अँड एरोस्पेस ही भारतातील अग्रगण्य उत्पादक कंपनी नागपूर येथे विस्तार करीत आहे. या अत्याधुनिक संरक्षण व एरोस्पेस उत्पादन प्रकल्पासाठी अटी व शर्तीनुसार मिहानतर्फे 223 एकर जागेचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

रामगिरी निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात मिहान प्रकल्पातील वैशिष्ट्यपूर्ण ठरणाऱ्या या प्रकल्पासाठी जमिनीचे हस्तांतरण मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते सोलार कंपनीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांना करण्यात आले. याप्रसंगी सोलार ग्रुपचे संचालक मनीष नुवालराघव नुवालसोलारचे वरिष्ठ अधिकारी जे.एफ साळवेमहाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे सह व्यवस्थापकीय संचालक तथा जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकरवरिष्ठ व्यवस्थापक गौरव उपश्यामसंजय इंगळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi