कर्जत - जामखेड मतदारसंघातील १३ वस्त्यांना
“वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने” अंतर्गत
१०० लाख रुपयांचा निधी मंजूर
विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांची माहिती
अहिल्यानगर, दि. १४ : “वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना सन २०२५ - २६” अंतर्गत कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघातील १५ गावातील विविध तांडा, वाडी व वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी १०० लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिली.
या योजनेचा उद्देश ग्रामीण व वंचित समाजघटकांच्या वस्त्यांमधील पायाभूत सुविधा सुधारणे, नागरिकांना आवश्यक सोयी - सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हा आहे.
या मंजूर १०० लाख निधीतून कर्जत तालुक्यासाठी ५९ लाख रुपये आणि जामखेड तालुक्यासाठी ४१ लाख रुपये असा निधी विभागला गेला असून, या कामांना शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या अंतर्गत तांडा, वाडी व वस्त्यांमध्ये अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक्स बसविणे, सौरप्रकाश दिव्यांची व्यवस्था, वीजपुरवठा, बसस्टॉप उभारणी आणि अन्य सार्वजनिक सोयीसुविधांची उभारणी करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment