कामगार विभागाच्या वेबसाईटचे
कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांच्याहस्ते उद्घाटन
कारखानदार व कामगारांसाठी उपयुक्त माहितीचा नवा स्रोत
मुंबई, दि. ७ : कामगार विभागाच्या https://labour.maharashtra.
राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या दीडशे दिवसांच्या विशेष कार्यक्रमांतर्गत कामगार विभागाने नवीन वेबसाईटची निर्मिती केली आहे. या वेबसाईटमध्ये राज्यातील सर्व कारखानदार तसेच कामगार बांधवांना उपयुक्त ठरणारी विविध माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या उपक्रमाबाबत कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांनी कामगार विभागाला आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले. कामगार, कारखानदार, सर्वसामान्य नागरिक यांच्यासह दिव्यांग व्यक्तींना सुद्धा वेबसाईट वापरायला अत्यंत सोपी असावी, असेही मंत्री ॲड.फुंडकर यांनी यावेळी सांगितले.
या वेबसाईटची निर्मिती करण्यासाठी कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, उपसचिव दीपक पोकळे, उपसचिव स्वप्नील कापडणीस आणि संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment