सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात राष्ट्रीय एकता दिनाची शपथ
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन
मुंबई, दि. ३१ : भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात मुख्य सचिव राजेश कुमार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार करून अभिवादन केले. तसेच दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना राष्ट्रीय संकल्प दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस ही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भारतीय एकात्मतेसाठी निश्चियपूर्वक धोरण आखून त्यासाठी पावले उचलणाऱ्या सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांना मुख्य सचिव राजेश कुमार यांनी शपथ दिली.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकज कुमार, अवर सचिव गोविंद साबने, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, श्री. उतेकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment