मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील सहा लाख ५६ हजार ३१०.८३ हेक्टर क्षेत्रातील बाधित पिकांच्या नुकसानीपोटी सहा लाख १२ हजार १७७ शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यापूर्वी या शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत मदत मंजूर करण्यात आली होती, तर आता अतिरिक्त एक हेक्टरसाठी ही वाढीव मदत देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा आधार दिलासा मिळणार असल्याचा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी व्यक्त केला छत्रपती संभाजीनगर विभाग- बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातील तीन लाख ५८ हजार ६१२ शेतकऱ्यांच्या तीन लाख ८८ हजार १०१.१३ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी ३४६ कोटी ३१ लाख ७० हजार रुपये.
नागपूर विभाग- नागपूर, चंद्रपूर , वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातील तीन हजार ९३१ शेतकऱ्यांच्या सात हजार ६९८.२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी सात कोटी ५१ लाख ७५ हजार रुपये.
नाशिक विभाग - नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील ५३ हजार ८६५ शेतकऱ्यांच्या ५० हजार ६२९ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी ५९ कोटी ३६ लाख १३ हजार रुपये.
अमरावती विभाग - अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील एक लाख ७ हजार ६१५ शेतकऱ्यांच्या एक लाख ३९ हजार ४३८.२३ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी १३१ कोटी ५६ लाख ४७ हजार रुपये.
पुणे विभाग - सोलापूर व सांगली जिल्ह्यातील ८८ हजार १४३ शेतकऱ्यांच्या ७० हजार ४१८.८९ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी १०३ कोटी ३७ लाख २० हजार रुपये.
कोकण विभाग - ठाणे व पालघर जिल्ह्यातील ११ शेतकऱ्यांच्या २५.३३ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी दोन लाख १६ हजार रुपये.
No comments:
Post a Comment