महाराष्ट्राची कला व संस्कृती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून यातील अनेक घटक हे नव्याने प्रेक्षकांसमोर यायला हवेत, असे प्रतिपादन ॲड. आशिष शेलार यांनी यावेळेस केले. "वाद्य मंथन" या ई-पुस्तकाचा उपयोग विद्यार्थी, अभ्यासक, कलाकार व रसिकांना नक्कीच होईल असा विश्वासही त्यांनी या वेळेस व्यक्त केला. यापुढेही महाराष्ट्राच्या दुर्मिळ संस्कृतीचे दस्तऐवजीकरण करण्यात येईल असेही ॲड. आशिष शेलार यांनी प्रतिपादन केले.
या पुस्तक प्रकाशनसमयी व्यासपीठावर वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वाल, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, मुख्य पोस्ट मास्तर जनरल अमिताभ सिंह, संचालक विभीषण चवरे, पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, सहसंचालक श्रीराम पांडे, तेजस्विनी आचरेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment