विकास आणि रोजगार
गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक येत असून, हा जिल्हा 'स्टील मॅग्नेट' बनत आहे. गुंतवणूक करणाऱ्यांना ९० टक्के स्थानिकांना रोजगार देण्याच्या अटीवरच परवानगी दिली जात असून, १ लाख स्थानिकांना रोजगार देण्याचा मानस आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. गडचिरोलीत पायाभूत सुविधा उभारताना जल, जमीन, जंगल यांचा विनाश होऊ नये यासाठी ५ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. पुढील काळात गडचिरोलीला देशाचे ग्रीन स्टील हब तयार करण्यासाठी योजना आखल्या जात असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी प्रास्ताविकात सांगितले की, २०२१ पासून आतापर्यंत १४० माओवाद्यांना अटक करण्यात आली, तर ८१ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, ९३ जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
यावेळी नक्षल पीडित कुटुंबांना धनादेशांचे वितरणही करण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी उपस्थितांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment