Thursday, 16 October 2025

दिवंगत सुधाकरपंत परिचारक यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव

 दिवंगत सुधाकरपंत परिचारक यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत्यांच्यासोबत काम करण्याची आणि त्यांच्यासोबत विधानसभेतही काम करण्याची संधी मिळाली. समाजात अशाप्रकारचे निस्पृह नेते फार थोडे पहायला मिळतातस्वत:च्या कर्तृत्वाने त्यांनी मोठेपण मिळविले. त्यांना सर्व मोठे मालक म्हणत असले तरी पंढरीच्या पांडुरंगाला मालक समजून सेवेकऱ्याच्या भावनेने त्यांनी आजन्म सामान्य माणसाची सेवा केली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित जनसमुदाय हे मोठ्या मालकांनी कमावलेले प्रेम आहे. ज्यांची सत्ता समाजाच्या मनावर असते ती कायम टिकतेम्हणूनच सर्वजण त्यांच्या प्रेमापोटी आलेअसे ते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi