विविध क्षेत्रातील भागीदारीसाठी सहकार्याच्या नव्या शक्यता
– कॅनडाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती अनिता आनंद
ही राजनैतिक भेट विकासासाठी नव्या ऊर्जेचे निदर्शक असल्याचे सांगून कॅनडाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती अनिता आनंद यांनी एसएमआर टेक्नॉलॉजी क्षेत्र हे कॅनडाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून विविध क्षेत्रातील भागीदारीसाठी दोन्ही देशांतील सहकार्याच्या नव्या शक्यता समोर आल्याचेही नमूद केले. महाराष्ट्राचे डेटा , तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदान अधोरेखित झाले आहे, असेही त्या म्हणाल्या.
दोन्ही देश एकत्र येऊन आधुनिक आणि भविष्याभिमुख भागीदारी निर्माण करत आहेत. यामुळे दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी नव्या संधी निर्माण होतील. कॅनडा-भारताने सर्वसमावेशक विकासासाठी वाटचाल करणे हा ऐतिहासिक टप्पा आहे. याद्वारे रोजगारनिर्मिती, उच्च शिक्षणातील उत्तम संधी, दोन्ही देशांतील जनतेचे जीवनमान समृद्ध करणे ही उद्दिष्टे गाठता येतील. करणारे ठरणार आहे. परस्पर सहकार्याचा भाव हे संबंध अधिक दृढ करत असल्याचेही श्रीमती अनिता आनंद यांनी नमूद केले.
No comments:
Post a Comment